“शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही – सुप्रिया सुळे”

मुंबई | चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पुछेगा, समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा, गुरू का बडा महत्त्व होता है, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केलं.राज्यपालांच्या या विधानाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सु्ळे यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारयांचा एक व्हिडीओ ट्विट करत राज्यपालांना उत्तर दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे आदरणीय पवार साहेबांनी शरद स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,”जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं… रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजामाता होत्या, असं सांगणारा शरद पवारांचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून राजामाता जिजाऊ याच शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे गुरु कोण? हा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

सुप्रिया सुळे यांनी एकूण पाच ट्विट केले आहेत. व्हिडीओ आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपीही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असं सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत म्हटलं आहे.

Team Global News Marathi: