शिवजयंती निमित्त शिवप्रेमीनंतर मनसे सुद्धा आक्रमक, नियमावली बदलण्याची केली मागणी

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या एक वर्षांपासून सर्व सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने सर्व जनतेला केले होते. त्यापाठोपाठ काही दिवसांवर आलेली शिवजंयती सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकारने शिवप्रेमींना केले होते. मात्र या निर्णयाला शिवप्रेमींनी विरोध दर्शवला होता. आता त्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट केले आहे. “शिवजयंती हा आपला वर्षा तील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बार ची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती ला नियमावली. असा प्रश्न नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: