शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा या ठिकाणी होणार संपन्न, संजय राऊत यांची घोषणा

 

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील एका सभागृहात पार पडला होता. मात्र काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यंदाचा दसरा मेळावा कोरोना संसर्गाचे नियम पा ळून पार पडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे यावेळी सुद्धा शिवसेनेचा मेळावा सभागृहात पार पडणार की शिवतीर्थावर अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येत होती.

मात्र आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जागा निश्चित झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावादेखील हॉलमध्येच होणार आहे. गेल्या वर्षीदेखील शिवसेनेचा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात संपन्न झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सभागृहात पार पडणार आहे.

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असेल. शिवसेनेचे मंत्री, वरिष्ठ नेते, उपनेते, आमदार, महापौर, काही नगरसेवक या सोहळ्याला हजर राहणार असतील. गेल्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा सावरकर सभागृहात संपन्न झाला होता.

Team Global News Marathi: