शिवसेनेचे मत म्हणजे आमचे मत नाही, नाना पटोले यांचे विधान

मुंबई : विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये दुमत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवसेनेने विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी केल्याच्या एक दिवसानंतरच महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावर भाष्य केले आहे.

शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही. ते म्हणाले, “सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची नाही.” असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेली शिवसेना पटोले यांच्या टीकेला काय उत्तर देणार हे आता पाहावे लागणार आहे,

मुख्यत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सभागृहात हिंदुत्वादाच्या मुद्द्यावर बुधवारी टोला लगावला होता. केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही. भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये.“सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे,” असे ठाकरे म्हणाले होते.

Team Global News Marathi: