अभिनेता मिथुन चक्रवर्ती करणार लवकरच भाजपात प्रवेश ?

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवधुकीचा बिघुळ वाजले आहेत. या निववडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममतादीदी आणि भारतीय जनता पक्षामध्ये मुख्य लढत होणार आहे. तसेच निवडणुकीच्या पूर्वी अनेक तृणमूल काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजपात प्रवेश केला होता. हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मनाला जात आहे.

त्यात आता मिथुन चक्रवर्ती लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे अशी जोरदार चर्चा पश्चिम बंगालमध्ये सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबई मधील निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

विशेष म्हणजे बंगालमध्ये भाजपा आपल्या पक्षाला स्थानिक चेहरा देण्यासाठी शोध घेत असताना मुळचे बंगाली असणारे मिथुन आणि सरसंघचालकांची भेट महत्त्वाची मानली जात होती. या निवडणुकांच्या अनुशंघाने भाजपा मिथुन यांच्यावर काही जबाबदारी सोपविणार असल्याची देखील चर्चा रंगू लागली होती.

आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर आहेत. येत्या ७ मार्च रोजी ते पश्चिम बंगालमध्ये भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची बाब समोर आली आहे.

Team Global News Marathi: