शिवसेनेच्या पुढाकाराने सांगलीत एसटी धावली; सेनेने शहरी बसेसला दिले संरक्षण

 

सांगली | सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने सांगली- मिरज मार्गावर एसटी बस धावली. शहरी वाहतुकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांच्या संरक्षणामध्ये सांगली ते मिरज या मार्गावर शहरी बसेस धावल्या. सांगली आगारात येवून एसटी बस रोखून दाखवाच शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देवू. असा सज्जड इशार पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

शिवसेनाचे शहर प्रमुख महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सांगली आगारात जमा झाले होते. आगारप्रमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एसटी कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी चालक व वाहकांना पाचारण करण्यात आले आहे. एकीकडे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आकर्णस्यठी आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मात्र सेनेच्या पुढाकाराने सांगलीत एसटी धावल्यामुळे प्रवाशांनी आभार मानले आहेत.

फलाटवर लागलेली खाजगी वाहतूक हटवून गेल्या अनेक दिवसापासून डेपोत असणार्‍या शहरी बसेस अखेर फलाटावर लागल्या. सांगली ते मिरज या मार्गावर शिवसैनिकांच्या बंदोबस्तात बसेस सोडण्यात आल्या. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी केली

Team Global News Marathi: