बारचे फोटो शेअर करत क्रांती रेडकरची नवाब मलिकांवर टीका

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंयक मंत्री नवाब मलिक हे सतत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या जातीवर, नोकरीवर तसेच कुटुंबियांवर अनेक आंभीर आरोप लगावत आहेत. त्यातच आता त्यांनी वानखेडे यांच्या नवे असलेल्या रेस्तराँ अँड बारवर काही प्रश्न उपस्थित केले होते. यावरून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिले होते आता या प्रकरणावर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मलिक यांना सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.

क्रांती रेडकरने दोन फोटो ट्वीट केले आहेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्तराँ अँड बारचे आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्या फोटोत या बारची माहिती दिली आहे. यासोबतच मलिकांवर ‘फर्जीवाडा’ शब्द वापरुन टीका केली आहे. ट्वीटसह क्रांती म्हणते, ”पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्तराँ अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा’. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा, जबाबदार पदावर बसून हे असं वागताहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे असं क्रांती म्हणाली.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधला. ‘समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,’ अशा कॅप्शनसह मलिकांनी हा फोटो शेअर केला होता. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला असून, तो ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे.

Team Global News Marathi: