मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हकालपट्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची सर्वात मोठी कारवाई; नेतेपदावरून हकालपट्टी

मुंबई: पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीचे पत्र जारी केलं आहे. तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहेत, तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे, त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची नावे घेतली होती, तसेच ते शिवसेनेचेच मुख्यमंत्री असल्याचे देखील सांगत होते. त्यानंत उध्व ठाकरे यांनी मोठी कारवाई केली आहे.ही पक्षांतर्गत कारवाई असून राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचे नेतेपद काढण्यात येईल असे सांगण्यात येत होते मात्र तेव्हा ते कायम ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पत्र जारी करत ही कारवाई केली आहे.

दरम्यान शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात आणखी एक याचीका करण्यात आली आहे. बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी यासाठी ही याचिका करण्यात आली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआगोदर बहुमत चाचणी घेण्यात येऊ नये अशी शिवसेनेकडून मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती मात्र सुप्रीम कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे आता ११ जुलै रोजीच सुनावणी होणार आहे.

घटना काय सांगते

शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या ठरावानुसार ९ जण पक्षनेते आहेत.

 

यापैकी सुधीर जोशी यांचं निधन झालं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख या अधिकारात चार जणांची पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती. या चार जणांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामध्ये अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती ठाकरेंनी केली आहे. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ठाकरेंनी शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: