राम मंदिरासाठी शिवसेनेने एक कोटी ट्रान्सफर केले उद्धव ठाकरे यांचे ते पत्र आले समोर…..!

राम मंदिरासाठी एक कोटी ट्रान्सफर केले उद्धव ठाकरे यांचे ते पत्र आले समोर…..!

ग्लोबल न्यूज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात पत्रकार परिषदेत मंदिर उभारणीसाठी १ कोटीची देणगी देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा फक्त घोषणा राहिली आहे असे आरोप तिथल्या एका महंताने केले होते. यावर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसादिवसी हे पैसे ट्रस्टच्या खात्यात जमा झाल्याची माहिती दिली आहे.

मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः ट्रस्टला लिहिलेले एक पत्र समोर आले आहे. या पत्रात त्यांनी आर.टी.जी.एसच्या माध्यमातून ट्रस्टच्या खात्यात १ कोटी रक्कम जमा केल्याचा निरोप पत्राद्वारे ट्रस्ट व्यवस्थापकांना कळविला आहे. त्यामुळे ट्रस्टच्या महंतांनी केलेला दावा सपशेल खोटा ठरलेला आहे.

या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, 5 ऑगस्टला राममंदिर निर्माणाच्या कार्याचा श्रीगणेशा होत आहे. जगातील कोट्यवधी हिंदू बांधव या क्षणाची चिरकाल प्रतीक्षा करत होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनानंतर हजारों शिवसैनिकांनी अयोध्या आंदोलनात भाग घेतला. माझीही श्रीरामावर अगाध श्रद्धा राहिली आहे.

संत तुलसीदासांनी म्हटलंय, ‘ बिनु सेवा जो द्रवै दीनपर राम सरिस कोउ नाहीं. मी शिवसेनेकडून राममंदिरासाठी १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. त्या घोषणेप्रमाणे २७ जुलैला ही रक्कम आरटीजीएस केली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: