मुंबई | भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी परंपरेप्रमाणे दहीहंडी साजरी करणारच असा विश्वास आज येथे व्यक्त करीत राज्याचे गृहमंत्र्यांनी आम्हांला घाटकाेपर पाेलिस ठाण्यात दहीहंडीची परवानगी घेण्यासाठी जाऊन द्यावे अशी मागणी माध्यमातून केली. तसेच मोठ्या संख्याने त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जमा झाले होते. यावेळी त्यांनी सेनेवर सुद्धा टीका केली होती.
आमदार राम कदम यांनी दहीहंडी साजरी करणारच हा निर्धार केल्याने त्यांच्या निवासस्थाना बाहेर मुंबई पाेलिसांनी बंदाेबस्त ठेवला आहे. त्यांना स्थानबद्ध करण्याचा हा प्रयत्न असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. दरम्यान शिवसेना ही हिंदू विराेधी वागत असून ती आता साेनिया सेना झाल्याची टिका राम कदम यांनी सेनेवर केली आहे.
यावेळी राम कदम यांच्या निवासस्थानी कृष्ण आणि राधा यांच्या वेषभुषेत गोपाळ आले आहेत. राज्य सरकारने दहीहंडीसाठी परवानगी दिली तर ठीक अन्यथा मी घाटकोपरला जाणारच असा चंग कदमांनी बांधला. ते म्हणाले परंपरेप्रमाणे आम्ही दहीहंडी उत्सवाचे आयाेजन केले आहे. परंतु आमच्या निवासस्थाना बाहेर पाेलिसांनी वेढा घालून येणा-या गाेविंद पथकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हा प्रकार हिंदु सणांना विराेध करणा-या ठाकरे सरकारमुळं घडत आहे.