आमदार राजू पाटील यांच्या टीकेला शिवसेना खासदाराचे प्रतिउत्तर….!

आमदार राजू पाटील यांच्या टीकेला शिवसेना खासदाराचे प्रतिउत्तर….!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील,पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो अशी टीका मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटील यांनी टीका केली होती. आता या टीकेला खुद्द मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या आमदारांनी प्रत्यक्षात कल्याण शीळ रोडवर फेरफटका मारावा, जेणेकरुन कल्याण शीळ रोडवर कुठे काम सुरु आहे हे कळेल. असा उपरोक्त टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आमदार राजू पाटील यांना लगावला आहे. त्यामुळे येणार्या दिवसात सेना-मनसे वाद आणखी वाढलेला दिसून येणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाण्यात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. सोमवारी उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही रस्ते चकाचक करण्यात आले. मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात आले होते हाच मुद्धा पकडत आमदार राजू पाटील यांनी सेनेला टोला लगावला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: