शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, ११ पैकी ४ महाराष्ट्राचे खासदार

 

नवी दिल्ली | चैन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई- मॅगझिनतर्फे देण्यात येणाऱ्या संसद रत्न पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली आहे. ११ खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे ११ खासदारांपैकी महाराष्ट्रातील ४ खासदारांना सन्मानित करण्यात आलं असून पुन्हा एकदा दिल्लीत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शविसेना कसदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि फौजिया खान तर भाजपच्या हिना गावित यांचा समावेश आहे. १२ वा संसदरत्न सोहळा येत्या २६ फेब्रुवारीला पार पडणार आहे. प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे लोकसभेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना २०१० पासून संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

१७ व्या लोकसभेच्या सुरूवातीपासून ते हिवाळी अधिवेशन २०२१ पर्यंतच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे, असं प्राईम पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवासन यांनी सांगितलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये ९२ टक्के उपस्थिती लावली आहे.

Team Global News Marathi: