शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतला कोरोनाचा दुसरा डोस !

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यापूर्वी त्यांनी पहिला डोस संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधला होता.

ते बोलताना म्हणाले की, लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते. तसेच विरोधकांना सुद्धा कोरोनावर राजकारण न करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळा, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असंही त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: