शिवसेना खासदार संजय राऊत विरोधात महिलेची तक्रार

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत विरोधात एका महिलेने विविध प्रकारचे आरोप लावले आहे. राऊत माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करतात अशी तक्रार उच्च शिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या तक्रारीमुळे आता महाराष्ट्रात एकचं खळबळ उडणार आहे.

या तक्रारीमध्ये महिलेने आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप राऊत यांच्यावर केला आहे. आता या प्रकरणी न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले आहेत.

‘सन २०१३मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. मात्र या प्रकरणी राऊत यांची साधी चौकशी सुद्धा करण्यात आली नाही असा आरोप महिलेने लगावला आहे.

मागच्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या छळाला कंटाळून मी गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून न्याय मागितला होता. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली होती.

Team Global News Marathi: