दहावी आणि बारावी परीक्षांच्या बोर्डाचे वेळापत्रक जाहीर

राज्यात मार्च महिन्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आल्या. तसेच शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावी बोर्डाची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या दरम्यान घेतली जाईल. तर बारावी बोर्डाची लेखी परीक्षा ही २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होईल असे बोराडकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा कशी होणार याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या फक्त तारखा जाहीर करण्यात आल्या. यावर्षी कोरोनामुळे विविध मंडळांच्या परीक्षा उशीर होणार असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले होते.

Team Global News Marathi: