शिवसेना खासदार भावना गवळी ईडी कार्यालयात आल्याच नाही, मागितली १५ दिवसांची मुदत!

 

मुंबई | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतही गवळी या हजर झाल्या नाही. त्यांनी ईडीकडे आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर ईडीने धडक कारवाई केली होती.

खासदार भावना गवळींशी संबंधी सईग खानला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर चौकशीसाठी भावना गवळी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र गवळी चौकशीला हजर झाल्याच नाही. आज त्यांना चौकशीला हजर व्हायचे होते. पण, त्यांनी ईडीकडे 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यामुळे भावना गवळी यांना ईडी पुन्हा एकदा समन्स बजावते का हे पाहण्याचे ठरणार आहे.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा या शासकीय निवास्थानी पोहोचल्या होत्या. उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण, जवळपास दीड तास त्या वर्षा बंगल्यावर प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेणे टाळले होते. त्यांना तसंच माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

Team Global News Marathi: