शिवसेनेच्या आमदाराचा अ‍ॅट्रोसिटीविषयी वादग्रस्त वक्तव्य, रिपाईने घेतली आक्रमक भूमिका |

 

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असताना. मात्र त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल वादग्रस्त विधान करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याचा एक व्हीडिओ नुकताच समोर आला आहे.

या व्हिडिओमुळे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांना कडक शासन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाने केली आहे. त्यामुळे हे प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना चँगलेच शिकताना दिसून येणार आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी खामगाव तालुक्यातील चितोडा, अंबिकापूर या गावातील दोन समाजातील कौटुंबिक वाद झालेल्या कुटुंबाला भेट दिली असता त्यांनी गावकऱ्यांशी बोलतांना अ‍ॅट्रोसिटीवरुन वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधान केले. या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. जर कुणी खोट्या अ‍ॅट्रोसिटी भीती दाखवत असेल तर त्याच्याविरोधात तुम्ही दरोड्याची तक्रार द्या, असं विधान करुन दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रकार आमदार गायकवाड यांनी केला होता.

Team Global News Marathi: