शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन चे काम आदर्शवत – जितेंद्र आव्हाड

 

 

नगरविकासमंत्री तथा ठाणे/गडचिरोली जिल्हा पालकमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब व कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन व होरायझन प्राईम हॉस्पिटल ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिबीराचे आयोजन या आरोग्य शिबीराचे उदघाटन आज गृहनिर्माण मंत्री मा.श्री जितेंद्र आव्हाड साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजिब मुल्ला साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन चे काम आदर्शवत आहे असे गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांनी भाषणामध्ये कौतुक केले तसेच जात – धर्म – पक्ष – पंथ न पाहता रुग्णसेवा करणार्या डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन चा सर्वांनी आदर्श घ्यावा असे राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते नजिब मुल्ला यांनी सांगितले.

या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, होरायझन प्राईम हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ.ऋषिकेश वैद्य, डॉ ए.पी.सिंघ, आकेश पारकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्क समनव्यक जिदेंद्र सातव, माऊली धुळगंडे, स्वरूप काकडे, भरत गोपाळे, सागर झाडे, ऋषिकेश देशमुख, राम राऊत, नितीन हिलाल, रोहित वायभासे आदी मान्यवर उपस्थित होते.

Team Global News Marathi: