मुंबई येथील शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. याच पार्श्वभूमीवर आता शविसेना गुंडाचा पक्ष म्हणून विरोधांनी टीका केली आहे. या टीकेसंदर्भात जेव्हा खासदार संजय राऊत यांना पत्रकार माध्यमांनी विचारले तेव्हा ते म्हणाले की, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले.
शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यानंतर मोठा राडा झाला. या प्रकरणी माहीम पोलीस स्थानका गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी विरोधकांना सुनावले. होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे.
सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे, असं राऊत म्हणाले आहेत.