शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

 

सिंधुदुर्ग | सांवतवाडी येथील एका शिवसेना नेत्याच्या अंगणात बिबट्याचा वावर असल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री बिबट्यानं संबंधित नेत्याच्या घराच्या परिसरात शिरकाव करत एका कुत्र्याला भक्ष्य केलं होत. सकाळी एक कुत्रा गायब असल्याचं निदर्शनास आल्यानंतर CCVT फुटेज तपासले असताना बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचं दिसून आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार बाबल ठाकूर असं संबंधित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे ते सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देखील आहे. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास एका हिंस्त्र बिबट्यानं त्यांच्या बंगल्याच्या परिसरात शिरकाव करत, दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका कुत्र्यानं आपली सुटका करून घेतली. पण दुसरा एक पाळीव कुत्रा बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्यानं एका गायीच्या वासरावर हल्ला केला होता. यानंतर आता नाणोस येथील शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्यानं शिरकाव केला आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्या बंगल्याच्या परिसरात शिरकाव करत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भर वस्तीत बिबट्यानं शिरकाव केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Team Global News Marathi: