‘ऐतिहासिक पुरावे हे सिद्ध करतात, सर्वांचे पूर्वज हिंदूच’ भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

 

भारतीय जनता पक्षाचे नेते सतत वादग्रस्त विधाने करून स्वतःच आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करण्याचे काम करताना दिसून येतात. त्यातच आता शिवराज सरकारमधील मंत्री आणि मध्य प्रदेशच्या महूच्या आमदार उषा ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांचा या विधानावर आमदार उषा ठाकूर यांनी समर्थन दिले आहे.

त्या म्हणाल्या,’ ऐतिहासिक पुरावे हे सिद्ध करतात की खरंतर सर्व पूर्वज हिंदूच होते. जर तुम्ही गेल्या चार-पाच पिढ्यांचा अभ्यास केलात तर तुम्हाला स्वतःलाच हे लक्षात येईल.’ असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं आहे . भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आता यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, त्या नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यावेळी लोकांना संबोधित करताना ठाकूर यांनी वादग्रस्त विधानं केलं आहे. त्यापुढे बोलतांना म्हणाल्या, ‘सद्यस्थितीतील वाढते धोके पाहता प्रत्येक घरात परवानाधारक शस्त्रे-अस्त्रे ठेवली पाहिजेत’ त्यांचा या विधानामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

Team Global News Marathi: