शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षामध्ये करण्यात आली वाढ

 

मुंबई | मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. तसेच सेना-भजपा यांच्यातील संघर्ष सुद्धा चांगलाच पेटू लागला होता. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून नारायण राणे यांच्यावर टीका करणे सुरूच ठेवले होते. याच पार्श्वभूमीवर नारायण राणेसह त्यांच्या दोन्ही पुत्रांनी थेट राऊत यांनी सडेतोड उत्तर देत थेट धामीच दिली होती.

भाजप नेते निलेश राणे यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांच्या दिमतीला सहा शस्त्रधारी जवान देण्यात आले असून राऊत यांच्या घराला छावणीचं स्वरुपही आलं आहे. राणे आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षानंतर शिवसेना संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच राऊत यांच्या घरीही सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने घराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी कदम यांनी राऊत यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली. तसेच कदम यांनी राऊत यांना सुरक्षेच्या अनुषंगाने काही सूचना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आता राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण ६ शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे

Team Global News Marathi: