“शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला”

 

शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान असल्याच वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. त्यात काँग्रेसने सेनेला आणि राष्ट्रवादीला टोला लगावत ही महाविकास आघाडी काँग्रेसमुळे स्थिर असल्याच विधान केले होते.

याच वक्तव्यावरून भाजप आमदार श्वेता महाले यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला असल्याची’ टीका महाले यांनी शिवसेनेवर केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत, असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. हाच धागा पकडून महाले यांनी शिवसेनेला टार्गेट केले होते.

 

हा वाद असताना या वादात काँग्रेसने उडी घेऊन काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे यांनी ट्विट करून राष्ट्रवादी आणि सेनेला टोला लगावला होता. या तिन्ही पक्षातील या वादावरून श्वेता महाले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘काल राष्ट्रवादी आणि आज काँग्रेस, आघाडीतील नेते दररोज ठरवून मुख्यमंत्र्यांचा जाहीर अपमान करत आहेत. सेनेनं मात्र सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला आहे, असा टोला श्वेता महाले यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: