“२०१७ ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन्… प्रसाद लाड यांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला |

 

मुंबई | शनिवार पासून मुंबईत पडणाऱ्या धो-धो पावसामुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी तुंबले आहे तसेच अनेकांच्या घरात सुद्धा पावसाचे पाणी शिरून मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३० नागरिकांचा बळी घेतला आहे.

या दुर्घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्ष बसलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली होती. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेनेनं सामना अग्रलेखात सर्व दुर्घटना घडल्या त्या केवळ पावसामुळे घडल्या असल्याचं म्हटलं आहे. यावरून भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘ये मुंबई है ये सब जानती है’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी सामना वृत्तपत्राचा २ मे २०१७ या सालाचा एक फोटो शेअर केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामध्ये २०१७ मुंबई तुंबली तर मुख्यमंत्री जबाबदार आणि २०२१ मध्ये मुंबई तुबंली तर पाऊस जबाबदार… असं कसं चालेल?, असा सवालही प्रसाद लाड यांनी ट्विट करून राज्य सरकारला केला आहे.

 

Team Global News Marathi: