शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा पक्षाला “जय महाराष्ट्र’ म्हणत फडणवीसांच्या उपस्थित भाजपात प्रवेश

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थपन झाल्यापासून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी -पिंपरी चिंचव शहरामध्ये शिवसेनेला पहिला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे व कामगार नेते अमोल कलाटे यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तखासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक अमोल कलाटे यांनी पक्ष सोडल्याने आगामी निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

मुंबई येथे बुधवारी चिंचवडे यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी गजानन चिंचवडे यांनी चापेकर बंधू स्मारकाची प्रतिकृती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण चिंचवडे उपस्थित होते. गजानन चिंचवडे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात कॉंग्रेस या पक्षातून झाली. त्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेमधून काम सुरू केले मात्र आता त्यांनी भाजपच्या गोताती प्रवेश केला आहे.

Team Global News Marathi: