“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

 

मुंबई | महाविकास आघाडीतर्फे सोमवारी लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद या निमित्तानं पुन्हा राज्याला पहायला मिळाला आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्र बंदवरून शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा होती पण आजच्या दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. काही तरी लाज राखा वाझेंच्या औलादींनो, शिवाजी महाराज असते तर पाठीवर चाबकाचे कोरड ओढले असते, या शब्दात निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

नुकतचं चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर होते. या दोन्ही नेत्यांच्या एकाच व्यासपिठावर येण्यानं यांच्यातील राजकीय वैर संपेल असं वाटत होतं पण निेतेश राणे यांच्या या वक्तव्यानं वाद मिटणार नाही तर वाढणार असल्याचं दिसत आहे.

Team Global News Marathi: