अदानींच्या ताब्यातील बंदरांवर तीन देशांच्या जहाजांना बंदी

 

गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर १६ सप्टेंबर रोजी अंदाजे ३ हजार किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. या बातमीमुळे एकचं खळबळ उडाली होती तसेच विरोधकांनी सुद्धा केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती याच पार्श्वभूमीवर आता अदानी समूहाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

गौतम अदानी यांच्या ताब्यात असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचं हेरॉईन ड्रग्ज सापडल्यानंतर अदानी समुहाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना अदानी नियंत्रित बंदरांवर प्रवेशबंदी असेल. याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून होणार आहे.

अदानी समुहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. “१५ नोव्हेंबरपासून अदानींच्या बंदरांवर इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या जहाज, कंटेनर कार्गोंना प्रवेश दिला जाणार नाही.” हा नियम अदानी समुहाकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व बंदरांना लागू असेल. पुढील नोटीस येईपर्यंत या तीन देशांमधून येणाऱ्या जहाजांना अदानी पोर्टवर बंदी असेल.

 

Team Global News Marathi: