शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र न्याय देतील का? चंद्रकांत पाटलांचा टोला

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा.” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यत्र्यांना टोला लगावला आहे.

नेहमीच न्याय भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तसेच महिलांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण चालतो, असे सांगणारे उद्धव ठाकरे पूजा चव्हाणला न्याय देणार का?, सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचावर जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणात एक मंत्री गुंतले आहेत हे स्पष्ट झाले आहे, मात्र पोलीस का चौकशी करत नाही, मुलीचे आई वडील तक्रार देत नसतील तर सुमोटो केस दाखल केली पाहिजे, असंही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: