शिवसेनाप्रमुखांना राणे साहेबांची उंची माहीत होती त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं – प्रवीण दरेकर

 

मुंबई | संजय राऊत यांना प्रसारमाध्यमातून भाजपवर टीका करणे या पलीकडे अभ्यास करताना दिसत नाही. राणे साहेबांना मिळालेलं खातं छोट आहे की मोठा हे येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्या कामातून दाखवून देतील. राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली असुन त्यांना राणे साहेबांचे खातं छोटच वाटणार अशी, टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

केंद्र सरकराकच्या दुसऱ्या टर्मचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल करण्यात आला. त्यामध्ये नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. राणे यांना जे पद मिळालं त्यापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, राऊत यांना राणे साहेबांना काही मिळाले तरी ते छोटच वाटणार याची कल्पना आम्हाला आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना राणे साहेबांची उंची माहीत होती. त्यामुळेच त्यांनी राणे साहेबांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. परंतु आता संजय राऊत यांना राणे दोषाची काविळ झाली आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

राणे यांना मिळालेलं खातं छोट आहे,की मोठं हे येणाऱ्या काळामध्ये राणेसाहेब त्यांच्या कार्यपध्दतीतुन दाखवून देतील. त्यांना कोणतही खातं दिलं असतं तरी त्या खात्याला वजन प्राप्त करत जनतेला मदत करायचं काम ते नक्की केलं असतं, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

Team Global News Marathi: