शिवसेनेचे बिल्डर फसवणूक करणार, तर त्यांचे सगळे गुन्हे दंड माफ

ठाणे | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यावरून विरोधक महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत केला होता. अशातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २००८-०९ मध्ये ठाणे विहांग गार्डन येथील ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली, ५ मजले अनधिकृत बांधले. २०१२ मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आले.

गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले श्री. प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांच्याकडून सगळा दंड व व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानी निर्णय घेतला श्री. प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ.

ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार, परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापि माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया आज भाजपा डॉ. किरीट सोमैया यांनी दिली आहे. आता यावर महाविकास आघाडी काय प्रतिक्रिया देते हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: