एसटीच्या विलीनीकरणासाठी नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागमुस एसटी कर्मचारी मागच्या दोन महिन्यापासून आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनाला यश आलेले नाहीये. अशातच या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी खुद्द या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सुद्धा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

गेल्या अडीच महिन्यापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणासाठी संप सुरू आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते. येत्या २० जानेवारीला समितीचा दिलेला १२ आठवड्यांचा कालावधी पूर्ण होणार आहे; मात्र त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनावेळी विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते.

याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी संपकऱ्यांना वेळोवेळी सांगण्यात आले. त्यामुळे विलीनीकरणाऐवजी एसटी कर्मचाऱ्यांच्या भत्ते आणि मूळ वेतनात वाढ देण्यात आली आहे. शिवाय यापुढेही नियमित वेतन करार आणि वेतनाच्या फरकामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले; मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विलीनीकरणाच्या शिफारशींचं पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद उघडकीस आला आहे.

Team Global News Marathi: