शिवसेना भवनासमोर जो राडा झाला आहे त्याच उत्तर भाजपाला दिल जाईल – अनिल परब

पुणे | शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर कडाडून टीका केली होती याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेविरोधात शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. यावरी उपस्थित असलेल्या शिवसैनिकीयांनी भाजपाला चांगलाच चोप दिला होता. यानंतर राजकीय पटलावर देखील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. यावर शिवसेेनेतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यावर भाष्य केलं आहे. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. अनिल परब आज पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपाला इशारा दिला आहे.

तसेच उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याबाबत परब यांना विचारण्यात आलं. त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाईन संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर अनिल परब यांनी पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

Team Global News Marathi: