मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागितली कोल्हापूरकरांची माफी वाचा का ?

कोल्हापूर : कोल्हापूरच्या नागरिकांची यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालण्याचे वचन मी दिले होते, मात्र या पाईप लाइनचे काम होण्यास अंकी एक वर्षाचा विलंब लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी देऊ शकणार नाही, याबद्दल कोल्हापूकरांची मी जाहीर माफी मागतो, असे राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मुश्रीफ कबुली दिली

कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली थेट पाईपलाईन योजना तांत्रिक अडचणींसह कोरोनाचा कहर, वन विभागाकडून ना हरकत मिळण्यास झालेला विलंब आणि ठेकेदाराच्या चुकांमुळे रेंगाळली असल्याची कबुली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

आता मात्र ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित योजनेचा आढावा घेण्याकरिता शुक्रवारी सकाळी मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्याची माहिती दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, थेट पाईपलाईन योजना करण्याकरिता कोल्हापूरकरांनी दीर्घकाळ आंदोलन केले. केंद्र सरकारच्या यू.आय.डी.एस.एस.एम.टी. योजनेतून ४८८ कोटींच्या या योजनेला मंजुरी मिळाली. केंद्र सरकारने साठ टक्के, राज्य सरकारने वीस टक्के तर, महानगरपालिकेने वीस टक्के असा खर्चाचा भार उचलला आहे.

Team Global News Marathi: