‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ पुन्हा निलेश राणे यांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

 

मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राडे झालेले पाहायला मिळाले होते. दरम्यान, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

 

नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मुंबईतील जुहूमध्ये राणेंच्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी सायंकाळी युवासेनेच्या नेत्यांची वर्षा या सरकारी बंगल्यावर भेट घेतली. आता याच मुद्द्यावरुन बुधवारी नारायण राणेंनी टोला लगावलेला असताना निलेश राणेंनेही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ असा या फोटोचा मथळा असून खाली दोन फोटो देण्यात आले आहेत. यापैकी पहिला फोटो हा उद्धव ठाकरेंनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळेचा आहे. या फोटोवर, ‘युवा सेना कार्यकारिणीमधील आंदोलनावेळी लपलेल्या बड्या बापांच्या आणि आमदारांच्या पोरांना भेटायला उद्धव ठाकरेंना वेळ आहे,’ असे लिहिण्यात आले आहे. तर खाली कथित स्वरुपामधील जखमी कार्यकर्त्यांचे फोटो आहेत. या फोटोवर, ‘पण राणेंच्या बंगल्याखाली मारहाण झाल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या जखमी १६ शिवसैनिकांना भेटायला वेळ नाही,’ असा मजकूर आहे.

Team Global News Marathi: