उडत्या विमानात पायलटला ह्रदयविकाराचा झटका ; नागपूरमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

उडत्या विमानात पायलटला ह्रदयविकाराचा झटका; वाचा पुढे काय घडले 126 प्रवाश्यांचा जीव टांगणीला

हजारो फुटांवर विमान उडत असताना पायलटला ह्रदयविकाराचा झटका आल्याने सर्वांची तंतरली होती. अखेर या विमानाचे महाराष्ट्रातील नागपूरमध्ये इनर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानामध्ये 126 प्रवाश्यांसह कर्मचारीही होते. इमर्जन्सी लँडिंगमुळे सर्व प्रवाश्यांचा जीव वाचला असून पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बांग्लादेशच्या बिमान एअरलाईन्सचे (Biman airlines) विमान ओमानच्या मस्कटहून हिंदुस्थानमार्गे ढाकाकडे जात होते. हजारो फुटांवर उडत असताना अचानक विमानाच्या पायलटला ह्रदयविकाराचा झटका आला त्यावेळी विमान रायपूरजवळ होते. विमानाने कोलकाताच्या एटीसीला इमर्जन्सी लँडिंगसाठी संपर्क केला आणि अखेर विमानाची नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली.

याबाबत बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी आम्ही कोलकाता एटीसीशी संपर्क केला. त्यावेळी विमान रायपूरवर उडत होते.

कोलकाता एटीसीने आम्हाला नागपूर विमानतळावर लँडिंग करण्याचा सल्ला दिला. अकेर 11 वाजून 40 मिनिटांना नागपूरच्या विमानावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आणि पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ‘हिंदुस्थान टाइम्स’ने वृत्त दिले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: