शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे वापरात असलेल्या महागड्या वस्तूवरून आणि कपड्यावरून त्यांच्यावर टीका केली होती आता याच मुद्दयावरून भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला राणेंनी मलिक यांना लगावला.

नवाब मलिक यांनी २ नोव्हेंबरला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. वानखेडे वापरत असलेल्या महागड्या वस्तूंच्या किमती सांगून इतके पैसे वानखेडेंनी कुठून आणले, असा सवाल विचारला होता. यावेळी मलिकांनी वानखेडे ५० हजारांटे शर्ट पँट वापरतात, असं म्हटलं होतं. याच सगळ्या प्रकरणावर राणेंना प्रश्न विचारला असता राणेंनी मलिकांवर टोलेबाजी केली.

लोकांचे शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही, असा टोला लगावताना कोण कितीचं काय वापरतंय, याचं मलिकांना काय कराचयंय, त्यांचं त्यांनी पाहावं. त्यांचं काढलं तर अवघड होईल, असा इशारा नारायण राणेंनी मलिकांना दिला होता.

Team Global News Marathi: