नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री आता राहिले नाहीत” राणेंच्या टीकेला मलिक यांचे प्रतिउत्तर

 

मुंबई | आज झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट रास्तवराडीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर टीका केली होती आता या टीकेला मलिक यांनी प्रतिउत्तर दिले आहे. नारायण राणेंसारखे भित्रे मंत्री राहिले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना काही बक्षिस मिळाले नाही म्हणून काहीही बोलतात अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला नवाब मलिक यांनी उत्तर दिले आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत टीका करताना राणे म्हणाले की, “नवाब मलिक यांना राष्ट्रवादीने सोडून दिले आहे. त्यांच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्यांच्या जावयाकडे काय मिळाले हे सर्वांना माहित आहे. तरीही नवाब मलिक बोलत आहेत. आघाडीचे अनेक मंत्र्यांना अटक होणार आहे. त्याची चिंता कर डायलॉगबाजी करु नका,” असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यावर आता नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र सरकार टिकणार नाही असे वारंवार बोलत राहिले. आधी पंधरा दिवस, नंतर दोन महिने आणि आता वर्षभर अशी तारीख पे तारीख सुरु होती. हे सरकार भक्कम आहे. नारायण राणे तुमच्यासारखे भित्रे मंत्री आता राहिलेले नाहीत. जे भित्रे होते ते गेले. आता भाजपा यंत्रणेचा वापर करुन लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम करत असेल तर आम्ही घाबरणार नाही. जे घाबरत होते त्यांनी पक्ष सोडला. त्यांना बक्षिसपण मिळाले असेल. पण हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि २५ वर्षे हेच सरकार राहिल हे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते.

Team Global News Marathi: