एकनाथ शिंदेसाठी प्रसिद्ध वकील हरीष साळवे मैदाना, कोर्टात मांडणार बाजू ?

 

मुंबई | शिवसेना नक्की उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची याबाबतचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज सुप्रीम कोर्टात बाजू मांडत आहे. त्यामुळे कायद्याच्या अनेक कंगोरे यातून तपासले जातील. एकनाश शिंदे यांच्याकडून प्रसिद्ध वकील हरीष साळवे मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडलेला नाही.

त्यांना पक्षातूनच बळ मिळालं आहे, त्यामुळे याला बंडखोरी म्हणता येणार नाही असा युक्तिवाद हरीष साळवे यांनी केला आहे. हरीष साळवे यांनी आणखी कागदपत्रे सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ देखील वाढवून मागितला आहे. एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना हरीष साळवे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडलेला नाही. मात्र पक्षातील नेत्यांनाच नेतृत्व बदल हवा असेल तर यात चूक काय? असा सवाल साळवे यांनी उपस्थित केला.

तसेच पक्षात राहूनच एखाद्या नेत्याविषयी आवाज उठवणे याला बंडखोरी म्हणता येणार नाही. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले तर त्याला बंडखोरी म्हणता येईल, असं त्यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर कारवाई का होऊ शकत नाही याबाबत हरीष साळवे यांनी 10व्या सूचीचा आधार घेतला. दहाव्या सूचीनुसार कारवाईसाठी पक्ष सोडावा लागतो. पक्ष सोडला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. तसेच पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यासाठी तक्रार करणे देखील आवश्यक आहे, असा युक्तिवाद हरीष साळवे यांनी केला आहे.

संभाजी नगर मुद्द्यावरून काँग्रेसने झटकले हात, हा समान कार्यक्रमात मुद्धा नव्हता

मोठी बातमी | आम्हीच शिवसेना असल्याचं शिंदे गटाचे निवडणूक आयोगाला पत्र

Team Global News Marathi: