गुगल मॅपकडून औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ उल्लेख; आता MIM करणार तक्रार

 

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव बदलून ‘धारा शिव’ करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकराने मंजुरी दिली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. हा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. मात्र तत्पूर्वीच गुगल मॅपवर औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबाद शहराचे नाव ‘धारा शिव’, असे दाखवत असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण आहे. एमआयएमकडून याला विरोध केला जात असून लवकरच एमआयएम पक्षाकडून याबात तक्रार दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी आता याबाबत थेट गुगललाच जाब विचारला आहे. गुगुल मॅपवर झालेला बदल पाहता, आता त्याला विरोध होण्यास सुरवात झाली आहे. इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत, गुगलने शहराचे नाव कशाच्या आधारे बदलले असा प्रश्न उपस्थित केला आहे. जलील यांनी गुगलला टॅग करत केलेल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की, औरंगाबाद शहराचे नाव गुगलने कशाच्या आधारावर बदलले आहे हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?, तसेच ज्या कोट्यवधी नागरिकांसोबत हा खोडसाळपणा करण्यात आला आहे, त्याचं गुगलने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या निर्णयाला एमआयएम पक्षाने आणि काही संघटनांनी सुद्धा विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात एमआयएमने आणि इतर संघटनांनी औरंगाबादमध्ये मोर्चा सुद्धा काढला होता. असाच आणखी एक मोर्चा १२ तारखेलाही काढण्यात येणार आहे. असे असतानाच गुगल मॅपवर औरंगाबाद असे शोधले असता मराठीत औरंगाबाद तर इंग्रजीत ‘संभाजीनगर’ आणि मराठीत उस्मानाबाद तर इंग्रजीत ‘धारा शिव’ असा उल्लेख आढळून येत आहे. याचे स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एकनाथ शिंदेसाठी प्रसिद्ध वकील हरीष साळवे मैदाना, कोर्टात मांडणार बाजू ?

संभाजी नगर मुद्द्यावरून काँग्रेसने झटकले हात, हा समान कार्यक्रमात मुद्धा नव्हता

 

Team Global News Marathi: