शिंदे-ठाकरे गटाच्या सत्तासंघर्षावर 27 सप्टेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

 

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी झाली.यावेळी न्यायालयाने थोडक्यात युक्तिवाद ऐकून घेतला आहे. या प्रकरणावर आता 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्थगितीवर 27 तारखेला निर्णय होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये रखडलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टातील घटनापीठापुढे सुनावणी झाली.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेले पाच न्यायमूर्तींचे हे घटनापीठ ही सुनावणी झाली. राज्यातील सत्तासंघर्षावरी सुनावणासाठी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.

घटनापीठ स्थापन करताना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी त्यात स्वतःचा समावेश केला नाही. त्यामुळे सुनावणीदरम्यान ते घटनापीठाचा भाग नसणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसाठी तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी दिलेली नोटीस आणि त्याला देण्यात आलेले आव्हान, तसंच नंतर उद्भवलेले विविध कायदेशीर विवाद यावरील सुनावणी प्रलंबित आहेत. २३ ऑगस्टला याप्रकरणाची शेवटची सुनावणी झाली होती.

Team Global News Marathi: