शिंदे मुंबईकडे रवाना, म्हणाले ‘हे सर्व सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी.’

 

मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. गोव्यातुन एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान ते मुंबईत पोहचतील. मुंबईसाठी निघताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले , ‘ मुंबईत जाणार आहे . राज्यपालांना भेटणार . शिवाय ‘आपण सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी वेगळे झालो ‘ असे त्यांनी गोव्यातून मुबईसाठी रवाना होण्याच्या आधी आमदारांना संबोधित करताना सांगितल्याचे कळते आहे.

विशेष म्हणजे गोव्याहून एकटेच एकनाथ शिंदे मुंबईकडे येत आहेत अशी माहिती मिळते आहे तर त्यांच्यासोबत बंडखोर आमदारांचा गट नसल्याचे कळते आहे. आज दुपारी मुंबईत आल्यानंतर ते पुढील वाटाघाटीकरिता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील.

शिवाय उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आणि सांगितले की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.

सध्या एकनाथ शिंदे भाजपसोबत नवे सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. नव्या मंत्रिमंडळाबाबत तर्क वितर्कही लडवले जात आहेत. त्याबाबतही एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे. ‘ भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका’ असे त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: