“चाणक्य आज लाडू खातील पण तुमचा सच्चापणा…” प्रकाश राज यांचे सूचक ट्विट

 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी खास उद्धव ठाकरेंसाठी पोस्ट लिहिली आहे. यापूर्वी सुद्धा राज यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात आपली भूमिका मांडली होती.

“तुम्ही खूप छान काम केले आहे उद्धव ठाकरे सर आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळले त्यासाठी महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. चाणक्य आज लाडू खातील तुमचा सच्चापणा अधिक काळ टिकेल. तुमच्यात आणखी शक्ती आहे.”, अशी पोस्ट प्रकाश राज यांनी ट्वीटरवर केली आहे.

सोशल मिडीयावर अनेक भावून पोस्ट कालपासून पहावयास मिळत आहेत. तरुण पिढीकडून अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यात उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेला एक गट दिसून येत आहे. राजकारणातील या घडामोडी इतिहासात कायम स्मरणात ठेवल्या जातील. काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे.

Team Global News Marathi: