“आदित्य ठाकरे व श्रिकांत शिंदे यांनी.” दिपाली सय्यद ह्यांचे सूचक ट्विट

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला धक्क्यावर धक्के देत आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तूळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 12 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात बैठक होणार आहे.

दुसरीकडे, आज आणखी आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे छावणीतील आमदारांची संख्या 50 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आपल्याला शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा असून 50 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी आदित्य ठाकरे आणि श्रिकांत शिंदे यांना आवाहन केले आहे.

“शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. माननीय आदित्य साहेब ठाकरे व श्रिकांत शिंदे साहेब यांनी ही जबाबदारी घेऊन कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र!”, असे ट्वीट दीपाली सय्यद यांनी केले आहे.

Team Global News Marathi: