शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंसह 14 आमदारांना थेट इशारा

 

शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी ठाकरेंकडे असलेल्या 14 आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेनेतील 14 आमदार आणि आणि वेगळे नाही, दिपक असं केसरकरांनी म्हटलं आहे.आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिसक्वालिफाय करायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला आहे.

संजय राऊत मधेच असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याची शक्यता नाहीय. नाहीतर आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत, असंही ते म्हणालेत.आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही नेत्यांनी लांब केले. ठाकरेंच्या एनसीपीचे नेते जवळचे झाले, आणि आम्ही लांब होत गेलो, असं ते म्हणालेत.

दरम्यान,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Team Global News Marathi: