शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

 

ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत बहुतांश आमदार, मंत्र्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांचा युवासेनेत समावेश करून घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेत कार्यरत असणाऱ्या काहींना युवासेनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

युवासेनेची ही नवी कार्यकारणी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणारे अनेक तरूण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेत. विविध विभागातील तरूण युवासेनेत काम करतील असं पावसकर यांनी म्हटलं.
युवासेनेच्या या कार्यकारणीत घराणेशाही नाही तर कुठली शाही आहे.

मात्र ज्याच्या घरात राजकीय वारसा आहे मग ठाकरेंची घराणेशाही कशी होऊ शकते? किरण पावसकर हे संधी शोधत होते पुन्हा उदयास यायची. पावसकरांची कार्यपद्धती सगळ्यांनी पाहिलंय. कार्यकारणीत काय नाविण्य दिले. चांगले कार्यकर्ते का मिळाले नाहीत. ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार काय? असं सांगत शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

कुणाला मिळाली युवासेनेच्या कार्यकारणीत संधी?
उत्तर महाराष्ट्र – अविष्कार भुसे
मराठवाडा – अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे पाटील
कोकण – विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र – किरण साळी, सचिन बांगर
कल्याण भिवंडी – दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई, पालघर – नितीन लांडगे, राहुल लोंढे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले
मुंबई – समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ – ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

Team Global News Marathi: