“बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला

 

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात हिंदुत्वाशी गद्दारी केली होती, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून शिवसेना दूर जात होती त्यामुळे आम्ही उठाव केला असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शुक्रवारी सायंकाळी शिंदे गटाने सैनिक कल्याण भवन येथे आयोजित केलेल्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात बोलत होते.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, शिवसेनेमुळे आम्ही मोठे झालो अशी टीका आमच्यावर केली जात आहे. मात्र आम्ही आंदोलने करत शिवसेनेलाही वाढवले. महाविकास आघाडी मधून बाहेर पडा असे उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी सांगितले मात्र त्यांनी ऐकून न घेतल्याने उठाव करावा लागला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

गुलाबराव पाटील यांना धुळे शहरातून सतीश महाले निवडणूक लढवतील याचे संकेत दिले. विधानसभा निवडणूकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. आजपासून तयारीला लागा असे फर्मान त्यांनी महाले यांना सोडले.माजी आमदार शरद पाटील मला विरोध करत आहेत मात्र त्यांना निवडून आणण्यासाठी ५० पेक्षा जास्त सभा घेतल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. धुळे शहरात उमेदवारी देत शिवसेना नेतृत्वाने हिलाल माळी यांची फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: