शिंदे गटातील ‘हा’ आमदार भ्रष्टाचारी, अजिबात मंत्रीपद देऊ नका, भाजपा कार्यकर्त्ये लिहिणार पक्ष नेतृत्वाला पत्र

 

भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने शिंदे गटातील एक आमदाराविरोधात आक्रमक पवित्र घेतला आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच पत्र लिहून तक्रार करणार असल्याचे त्याने म्हंटले आहे. “रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी वाळू विक्रीत 150 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्टाचारी नेत्याला मंत्रीपद देऊ नका, अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी म्हंटले आहे.

ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट शिंदे गटातील आमदार आशीष जयस्वाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “जस्वाला यांनी खूप भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या विरोधात आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे पुरावे देणार आहे. सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार असून संबंधित वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे”

विशेष म्हणजे जयस्वाल यांचा रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीवर डोळा आहे. खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल 150 कोटींचा गैरव्यवहार व खनिज विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सत्तेचा दुरुपयोग केला. यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालांवर 300 कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप करून चौकशीची मागणी केली होती. त्यावरून चौकशीस सुरवातही झाली होती. परंतु, तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केला आहे, असा आरोप डॉ. ठाकरे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: