“शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, ते आमदार परत येणार”

 

शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे.

“शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं! शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत, असा विश्वास चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरेंचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील”, असा दावा संदिपान भुमरे यांनी केला होता.

त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. “आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 40 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत”, असं विश्वास खैंरेंनी म्हटलं.

Team Global News Marathi: