शिंदे गटात सामील झालेले आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

 

बंडखोर आमदार संतोष बांगर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा बांगर हे शिवसेनेमध्येच होते. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा बांगर हे शिवसेनेमध्येच होते. बंडखोर आमदारांनी पुन्हा शिवसेनेत यावे असे आवाहान देखील त्यांनी केले होते. मात्र बहुमत चाचणीच्या दिवशीच ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले.

आमदार संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळी शिवसेनेच्या बाजुने मतदान केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी बहुमत चाचणीच्या अवघ्या काही तास आधी ते शिंदे गटाला येऊन मिळाले. बहुमत चाचणीत त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. याची गंभीर दखल आता शिवसेनेकडून घेण्यात आली असून, संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान असे काय झाले की सुरुवातीला शिवसेनेसोबत असलेले संतोष बागर हे बंडाच्या तब्बल तेरा दिवसांनंतर शिंदे गटात सहभागी झाले. यावर प्रतिक्रिया देताना संतोष बांगर यांनी म्हटले होते की, मी माझ्या मतदार संघातील लोकांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांचा सल्ला घेतला. सर्वांचे म्हणणे एकच होते की, राज्यात सध्या बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा हिंदुत्त्ववादी विचारांचा मुख्यमंत्री होत आहे. त्यामुळे तुम्ही देखील शिंदे गटात सहभागी व्हा. कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आपण शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे संतोष बांगर यांनी म्हटले आहे.मात्र त्यांच्यावर पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: