“शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागणार?” सुप्रीम कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय लढाई सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे यांच्या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात येत आहे. तर एकनाथ शिंदे गटाला एखाद्या पक्षात किंवा नवीन पक्ष स्थापन करावा लागणार असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. त्यामुळे यावर आता लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाला एकतर दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागणार नाहीतर स्वत:चा पक्ष स्थापन करावा लागणार. यावरून ते अपात्रतेची कारवाई टाळू शकतात. असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांच्या केला आहे. संविधानच्या दहाव्या कलमाचा संदर्भ देखील यावेळी देण्यात आला. शिंदे गटा 19 जुलै आयोगाकडे गेला.

अपात्र ठरवल्यानंतर शिंदे गट कोर्टात गेला. 29 जुनला कोर्टाची आपत्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली. शिंदेंच्या सदस्यत्वावर आमचा प्रश्न आहे. 29 जुननंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी झाला. यामुळे मुळ याचिकेवर आधी सुनावणी होणं गरजेचं आहे. असं कपिल सिब्बल य़ांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: